RMSA महिती PDF मध्ये Download करण्यासाठी येथे क्लिक करा >>> Download <<<<
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान
सर्व
शिक्षा अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे उच्च प्राथमिक शिक्षण पूर्ण
केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे माध्यमिक
शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाची निकड भासू लागली आणि त्यातूनच राष्ट्रीय
माध्यमिक शिक्षा अभियानाची निर्मिती झाली.
राष्ट्रीय
माध्यमिक शिक्षा अभियान : भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाने
11 व्या पंचवार्षिक योजनेत तब्बल 20,120 कोटी रुपयांची तरतूद करुन देशातील
माध्यमिक शिक्षणासाठी "राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान" हा उपक्रम सन
2009-10 पासून सुरु केला आहे. सन 2017 पर्यंत हा उपक्रम चालू राहणार आहे.
प्रथमत: 8वी, 9वी, 10 वी साठी पुरस्कृत केलेल्या ह्या उपक्रमात
अंमलबजावणीपासून जास्तीत जास्त दोन वर्षांच्या आत उच्च माध्यमिक स्तराचाही
समावेश केला जाणार आहे. हे अभियान मुख्यत: माध्यमिक शिक्षणाचे
सार्वत्रिकीकरण, गुणवत्तावाढ आणि माध्यमिक शिक्षणाची समानसंधी या
उद्दिष्टांवर आधारित आहे.
"ठळक बाबी"
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान (RMSA) : 2009-2020
- सर्व शिक्षा अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर मानव संसाधन विकास मंत्रालय , भारत सरकारने आखलेल्या माध्यमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाचा देशव्यापी कार्यक्रम.
- माध्यमिक शाळेमध्ये जाणा-या सर्व मुलामुलींना 2017 पर्यंत जीवनाश्यक आणि गुणवत्तापुर्ण शिक्षण देण्याची ग्वाही या उपक्रमांतर्गत देण्यात आली आहे.
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाची उद्दिष्टे
- Gross Enrolment Ratio राष्ट्रीय स्तरावर 52 टक्क्यांवरुन 75 टक्क्यांवर आणि राज्य स्तरावर 69 टक्क्यांवरुन 90 टक्क्यांवर आणणे.
- माध्यमिक शिक्षणाच्या पूर्तीमध्ये अपंगत्व, दुर्बल आर्थिक परिस्थिती, प्रतिकूल सामाजिक परिस्थिती, भौगोलिक परिस्थिती किंवा लिंगभेद यामुळे येणार अडथळे दूर करणे.
- सर्व माध्यमिक शाळा, शासनाने ठरविलेल्या किमान निकषांपर्यंत आणणे.
- सन 2017 पर्यंत शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करणे.
- सन 2020 पर्यंत माध्यमिक शिक्षणाची गळती शून्यापर्यंत आणणे.
प्रमुख तीन लक्ष्ये :
- माध्यमिक (8 वी ,9 वी, 10 वी ) शिक्षणाची गुणवत्ता सुधारणे .
- 14 ते 18 वयोगटातील सर्व मुलामुलींपर्यंत माध्यमिक शिक्षण पोहचविणे.
- सर्व समाजघटकांना माध्यमिक शिक्षणाची समानसंधी उपलब्ध करुन देणे.
- अंमलबजावणीच्या जास्तीत जास्त दोन वर्षाच्या आत उच्च माध्यमिक स्तराचाही समावेश प्रस्तुत कार्यक्रमात करणे. आवश्यकता ही RMSA चे लक्ष्य म्हणुनच मांडली आहे.
प्रमुख तरतुदी :
- माध्यमिक शिक्षा अभियाना मध्ये 8 ,9,10 या तीन इयत्तांचा समावेश करण्यात यावा. दर 5 कि.मी. अंतरावर माध्यमिक शिक्षणाची तर दर 7 ते 10 कि.मी. अंतरावर उच्च माध्यमिक शिक्षणाची सोय करण्यात यावी.
- ग्रामीण व दुर्गम डोंगराळ भागात वरील अंतर शिथिल करुन शाळेत विद्यार्थी व शिक्षकांची (विशेष महिला शिक्षका) राहण्याची सोय करावी.
- शाळेत भाैतिक सुविधा , कर्मचारी वृंद आणि अन्य गरजांची निर्धारित मानकांनुसार पूर्तता करणे.
- नवीन शिक्षक भरती व प्रशिक्षणाची व्यवस्था करणे.
- इ.8 वी तून बाहेर पडणा-या मुलांची शिकण्याची क्षमता वाढावी यासाठी ब्रिज पाठ्यक्रम तयार करणे.
RMSA Frame Work DOWNLOAD करण्यासाठी खालिल लिंक वर क्लिक करा.
No comments:
Post a Comment
Give Your Comments