Monday, October 3, 2016
बृहन्मुंबई : शाळा व्यवस्थापन व विकास समिती माहिती आढावा
बृहन्मुंबई : शाळा व्यवस्थापन व विकास समिती माहिती आढावा: शाळा व्यवस्थापन व विकास समिती माहिती आढावा Some Important Information About SMDC सदर माहिती सविस्तर PDF स्वरुपात मिळवण्यासाठी खा...
शाळा व्यवस्थापन व विकास समिती माहिती आढावा
शाळा व्यवस्थापन व विकास समिती माहिती आढावा
Some
Important Information About SMDC
सदर माहिती सविस्तर PDF स्वरुपात मिळवण्यासाठी खालील लिंक वर Click करा.
>>>>>>> Click here to Download SMDC Structure <<<<<<<<<<<<<<<<
शाळा
व्यवस्थापन व विकास समितीची
रचना ( SMDC )
- अ.क्र.नावप्रवर्गभूमिका1शाळेचे प्राचार्य / मुख्याध्यापक / प्रभारी मुख्याध्यापकअध्यक्ष2शाळेचे उपप्राचार्य / पर्यवेक्षक / जेष्ठ शिक्षकसदस्य - सचिव3गणित शिक्षकसदस्य4विज्ञान शिक्षकसदस्य5सामाजिक शास्त्र शिक्षकसदस्य6महिला पालक प्रतिनिधीसदस्य7पुरुष पालक प्रतिनिधीसदस्य8स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधीसदस्य9स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधीसदस्य10अनु.जाती / अनु.जमाती प्रतिनिधीसदस्य11शैक्षणिकदृष्ट्या मागास समुहाचा प्रतिनिधीसदस्य12महिला संघटना / बचतगट प्रतिनिधीसदस्य13शाळा व्यवस्थापन समिती सदस्य प्रतिनिधीसदस्य14शिक्षणाधिकारी(माध्य.) यांनी नामनिर्देशित केलेले विज्ञानतज्ज्ञ - 1सदस्य15शिक्षणाधिकारी(माध्य.) यांनी नामनिर्देशित केलेले कलातज्ज्ञ - 1सदस्य16शिक्षणाधिकारी(माध्य.) यांनी नामनिर्देशित केलेले विभागातील तज्ज्ञ - 1सदस्य17शिक्षणाधिकारी(माध्य.) यांनी नामनिर्देशित केलेले वित्त व लेखा विभागाचा प्रतिनिधीसदस्य
शाळा
इमारत उपसमिती
- अ.क्र.नावपदनामभूमिका1शाळेचे प्राचार्य / मुख्याध्यापक / प्रभारी मुख्याध्यापकप्रमुखशाळेचे उपप्राचार्य / पर्यवेक्षक / जेष्ठ शिक्षकसदस्य2पंचायत/ शहर स्थानिक संस्था प्रतिनिधीसदस्य3पालकसदस्य4बांधकाम अभियंता / सल्लागारसदस्य5लेखा परीक्षण व लेखा विभागसदस्य
विद्या
उपसमिती
अ.क्र.
|
नाव
|
पदनाम
|
भूमिका
|
1
|
शाळेचे
उपप्राचार्य /
पर्यवेक्षक
/ जेष्ठ
शिक्षक
|
प्रमुख
| |
2
|
पालक
|
सदस्य
| |
3
|
विज्ञान
/ गणित
तज्ज्ञ
|
सदस्य
| |
4
|
सामाजिक
शास्त्र तज्ज्ञ
|
सदस्य
| |
5
|
कला
/ हस्तकला/
क्रीडा
तज्ज्ञ
|
सदस्य
| |
6
|
विद्यार्थी
|
सदस्य
|
संकलन : Sachin
Narayan Kamble (KRP -RMSA / SMDC)
Sunday, September 25, 2016
Saturday, September 24, 2016
अब्राहम लिंकनचे हेडमास्तरांस पत्र
अब्राहम लिंकनचे हेडमास्तरांस पत्र .......
प्रिय गुरुजी,
सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात,
नसतात सगळीच सत्यनिष्ठ,
हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी.
मात्र त्याला हे देखील शिकवा,
जगात प्रत्येक बदमाशागणिक
असतो एक साधूचरित , पुरुषोत्तमही
स्वार्थी राजकारणी असतात जगात,
तसे असतात अवघं आयुष्य समर्पित करणारे नेतेही.
असतात टपलेले वैरी , तसे जपणारे मित्रही,
मला माहित आहे !
सगळ्या गोष्टी झटपट नाही शिकवता येत.........
तरीही जमलं तर त्यांच्या मनावर ठसवा,
घाम गाळून कमावलेला एकच छदाम,
आयत्या मिळालेल्या घबाडापेक्षा मौल्यवान आहे.
हार कशी स्वीकारावी ते त्याला शिकवा
आणि शिकवा विजयाचा आनंद संयमाने घ्यायला ,
तुमच्यात शक्ती असती तर .........
त्याला द्वेष मत्सरापासून दूर रहायला शिकवा
आणि शिकवा त्याला आपला हर्ष संयमाने व्यक्त करायला.
गुंडांना भीत जावू नको म्हणावं,
त्यांना नमविणे सर्वात सोपं असतं.
जमेल तेवढं दाखवित चला त्याला ,
ग्रंथ भांडाराच अदभूत वैभव.
मात्र त्याबरोबरच ,
मिळू दे त्याच्या मनाला निवांतपणा,
सृष्टीचं शाश्वत सौंदर्य अनुभवायला ,
पाहू दे त्याला , पक्षांची अस्मान भरारी ............
सोनेरी उन्हात भिरभिरणारे भ्रमर ..........
आणि हिरव्यागार डोंगर उतारावर डुलणारी चिमुकली फुलं......
शाळेत त्याला हा धडा मिळू दे ,
फसवून मिळालेल्या यशापेक्षा ,
सरळ आलेल अपयश श्रेयस्कर आहे .
आपल्या कल्पना, आपले विचार ,
यांच्यावर दृढ विश्वास ठेवायला हवा त्याने ,
बेहत्तर आहे सर्वांनी त्याला चूक ठरवलं तरी ,
त्याला सांगा ................
भल्याशी भलायीन वागावं,
आणि टग्यांना अद्दल घडवावी .
माझ्या मुलाला हे पटवता आल तर पहा .........
जिकडे सरशी तिकडे धावत सुटणाऱ्या भाऊगर्दीत,
सामील न होण्याची ताकद त्यान कमवायला हवी ,
पुढे हेही सांगा त्याला ,
ऐकावं जनाच अगदी सर्वांच ...........
पण गाळून घ्यावं ते सत्याच्या चाळणीतून ,
आणि फोलपट टाकून निव्वळ सत्व तेवढं स्वीकाराव.
जमलं तर त्याच्या मनावर बिंबवा,
हसत रहावं उरातल दुख्ख दाबून ,
आणि म्हणावं त्याला
आसवांची लाज वाटू देऊ नको.
त्याला शिकवा .........
तुच्छतावाद्याना तुच्छ मानायला ,
अन चाटुगिरीपासून सावध रहायला .
त्याला हे पुरेपूर समजवा की ,
करावी कमाल कमाई त्याने, ताकद आणि अक्कल विकून,
पण कधीही विक्रय करू नये, हृदयाचा आणि आत्म्याचा.
धिक्कार करणाऱ्यांच्या झुंडी आल्या तर,
कानाडोळा करायला शिकवा त्याला.
आणि ठसवा त्याच्या मनावर,
जे सत्य आणि न्याय वाटते,
त्याच्यासाठी पाय रोवून लढत रहा.
त्याला ममतेन वागवा,
पण, लाडावून ठेवू नका.
आगीत तावून सुलाखून निघाल्याशिवाय
लोखंडाच कणखर पोलाद होत नसतं,
त्याच्या अंगी बाणवा अधीर व्हायचं धैर्य,
अन धरला पाहिजे धीर त्याने,
जर गाजवायच असेल शौर्य .
आणखीही एक सांगत रहा त्याला ..........
आपला दृढ विश्वास पाहिजे आपल्यावर,
तरच जडेल उदात्त श्रद्धा मानवजातीवर,
माफ करा गुरुजी,
मी फार बोललो आहे _
खूप काही मागतो आहे.........
पण पहा........
जमेल तेवढ अवश्य कराच,
माझा मुलगा, भलताच गोड छोकरा आहे हो तो.
अब्राहम लिंकन
प्रिय गुरुजी,
सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात,
नसतात सगळीच सत्यनिष्ठ,
हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी.
मात्र त्याला हे देखील शिकवा,
जगात प्रत्येक बदमाशागणिक
असतो एक साधूचरित , पुरुषोत्तमही
स्वार्थी राजकारणी असतात जगात,
तसे असतात अवघं आयुष्य समर्पित करणारे नेतेही.
असतात टपलेले वैरी , तसे जपणारे मित्रही,
मला माहित आहे !
सगळ्या गोष्टी झटपट नाही शिकवता येत.........
तरीही जमलं तर त्यांच्या मनावर ठसवा,
घाम गाळून कमावलेला एकच छदाम,
आयत्या मिळालेल्या घबाडापेक्षा मौल्यवान आहे.
हार कशी स्वीकारावी ते त्याला शिकवा
आणि शिकवा विजयाचा आनंद संयमाने घ्यायला ,
तुमच्यात शक्ती असती तर .........
त्याला द्वेष मत्सरापासून दूर रहायला शिकवा
आणि शिकवा त्याला आपला हर्ष संयमाने व्यक्त करायला.
गुंडांना भीत जावू नको म्हणावं,
त्यांना नमविणे सर्वात सोपं असतं.
जमेल तेवढं दाखवित चला त्याला ,
ग्रंथ भांडाराच अदभूत वैभव.
मात्र त्याबरोबरच ,
मिळू दे त्याच्या मनाला निवांतपणा,
सृष्टीचं शाश्वत सौंदर्य अनुभवायला ,
पाहू दे त्याला , पक्षांची अस्मान भरारी ............
सोनेरी उन्हात भिरभिरणारे भ्रमर ..........
आणि हिरव्यागार डोंगर उतारावर डुलणारी चिमुकली फुलं......
शाळेत त्याला हा धडा मिळू दे ,
फसवून मिळालेल्या यशापेक्षा ,
सरळ आलेल अपयश श्रेयस्कर आहे .
आपल्या कल्पना, आपले विचार ,
यांच्यावर दृढ विश्वास ठेवायला हवा त्याने ,
बेहत्तर आहे सर्वांनी त्याला चूक ठरवलं तरी ,
त्याला सांगा ................
भल्याशी भलायीन वागावं,
आणि टग्यांना अद्दल घडवावी .
माझ्या मुलाला हे पटवता आल तर पहा .........
जिकडे सरशी तिकडे धावत सुटणाऱ्या भाऊगर्दीत,
सामील न होण्याची ताकद त्यान कमवायला हवी ,
पुढे हेही सांगा त्याला ,
ऐकावं जनाच अगदी सर्वांच ...........
पण गाळून घ्यावं ते सत्याच्या चाळणीतून ,
आणि फोलपट टाकून निव्वळ सत्व तेवढं स्वीकाराव.
जमलं तर त्याच्या मनावर बिंबवा,
हसत रहावं उरातल दुख्ख दाबून ,
आणि म्हणावं त्याला
आसवांची लाज वाटू देऊ नको.
त्याला शिकवा .........
तुच्छतावाद्याना तुच्छ मानायला ,
अन चाटुगिरीपासून सावध रहायला .
त्याला हे पुरेपूर समजवा की ,
करावी कमाल कमाई त्याने, ताकद आणि अक्कल विकून,
पण कधीही विक्रय करू नये, हृदयाचा आणि आत्म्याचा.
धिक्कार करणाऱ्यांच्या झुंडी आल्या तर,
कानाडोळा करायला शिकवा त्याला.
आणि ठसवा त्याच्या मनावर,
जे सत्य आणि न्याय वाटते,
त्याच्यासाठी पाय रोवून लढत रहा.
त्याला ममतेन वागवा,
पण, लाडावून ठेवू नका.
आगीत तावून सुलाखून निघाल्याशिवाय
लोखंडाच कणखर पोलाद होत नसतं,
त्याच्या अंगी बाणवा अधीर व्हायचं धैर्य,
अन धरला पाहिजे धीर त्याने,
जर गाजवायच असेल शौर्य .
आणखीही एक सांगत रहा त्याला ..........
आपला दृढ विश्वास पाहिजे आपल्यावर,
तरच जडेल उदात्त श्रद्धा मानवजातीवर,
माफ करा गुरुजी,
मी फार बोललो आहे _
खूप काही मागतो आहे.........
पण पहा........
जमेल तेवढ अवश्य कराच,
माझा मुलगा, भलताच गोड छोकरा आहे हो तो.
अब्राहम लिंकन
Subscribe to:
Posts (Atom)