Friday, October 21, 2016

मुलींकरिता स्व:संरक्षण प्रशिक्षणाबाबत

मुलींकरिता स्व:संरक्षण प्रशिक्षणाबाबत
                                  Image result for rmsa logo

राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान अंतर्गत माध्यमिक शाळांतील  मुलींकरिता स्व: संरक्षण प्रशिक्षण अनुदान प्राप्त झाले असून त्या बाबतीत अधिक माहिती करिता खालील लिंक वर क्लिक करा  



प्रशिक्षण व्यवस्था , अल्पोपहार, व प्रचार प्रसिद्दी,  Banner, फोटो, मुलींची बक्षिसे, प्रमाणपत्र व प्रशिक्षकांचे मानधन इ. साठी खर्च करण्यात यावा.  

स्व: संरक्षण प्रशिक्षण अंमलबजावनी अधिक माहिती वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.


मुलींकरिता स्व:संरक्षण प्रशिक्षणाबाबत

मुलींकरिता स्व:संरक्षण प्रशिक्षणाबाबत

Image result for rmsa logo

राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान अंतर्गत माध्यमिक शाळांतील  मुलींकरिता स्व: संरक्षण प्रशिक्षण अनुदान प्राप्त झाले असून त्या बाबतीत अधिक माहिती करिता खालील लिंक वर क्लिक करा  



प्रशिक्षण व्यवस्था , अल्पोपहार, व प्रचार प्रसिद्दी,  Banner, फोटो, मुलींची बक्षिसे, प्रमाणपत्र व प्रशिक्षकांचे मानधन इ. साठी खर्च करण्यात यावा.  

स्व: संरक्षण प्रशिक्षण अंमलबजावनी अधिक माहिती वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.


Saturday, October 8, 2016

Cloud Print

🖨 मोबाईल वरून प्रिंट 🖨

मित्रहो,
    आपल्या पैकी अनेक जणांना असे वाटत असेल की आपण जर आपल्या documents ची प्रिंट pc वरून न काढता direct मोबाईल वरून काढले तर किती सोपे होईल.
तर मग चला शिकू या हे कसे करायचे??


⌨⌨⌨⌨⌨⌨⌨⌨⌨
🎴 या कृती साठी आपल्याकडे wifi सुविधा असणे आवश्यक आहे
🎴 आपला मोबाईल आणि pc एकाच wifi ने connected असले पाहिजे
⌨⌨⌨⌨⌨⌨⌨⌨⌨

➡ सर्व प्रथम आपल्या computer वर Google chrome  सुरु करा
➡ ज्या मोबाईल ने प्रिंट काढायचे आहे त्या मोबाईल मध्ये वापरलेला  Gmail account नी येथे लॉगिन करा.
➡ उजव्या बाजूला वरच्या ठिकाणी तीन आडवे रेषा आहेत तिथे क्लीक करा
➡ setting मध्ये जा
➡ त्यात Advance setting हा पर्याय निवडा
➡ scroll करून cloud print हा पर्याय क्लीक करा
➡ Add printer वर क्लिक करा
➡ आपल्या computer सोबत जोडलेले सर्व प्रिंटर ची यादी दिसेल
➡ पुन्हा ऍड प्रिंटर वर क्लिक करा
➡ ज्या मोबाईल ने प्रिंट काढायचे आहेत त्यात cloud print नावाची app install करून run करा   सदर app ची लिंक messege च्या शेवटी दिलेली आहे
➡ cloud print हे app सुरु केल्यावर आपल्या ला account विचारतो. तिथे आपला Gmail चा account आलेला असेल त्यावर क्लिक करा
🎯 वरील setting आपल्याला फक्त एकाच वेळी करावी लागेल

🖥 आता आपला मोबाईल प्रिंट साठी तयार आहे

या trik ने आपण आपले मोबाईल मधले कोणतेही documents ची प्रिंट काढू शकतो

या शिवाय आपण आपल्या messege,contacts, search केलेले web page,whatsapp messeges ची प्रिंट हि काढता येते

Friday, October 7, 2016

शाळा व्यवस्थापन व विकास समिती सभा वृतांत

शाळा व्यवस्थापन व विकास समिती सभा वृतांत कसा लिहावा.

PDF मध्ये माहिती प्राप्त करण्यासाठी खाली क्लिक करा.


  • SMDC अर्थात शाळा व्यवस्थापन व विकास समिती ची सभा वृतांत कशा प्रकारे लिहिला जावा यासाठी नुमाना आपल्यास देण्याचा प्रयत्न करत आहे.
बैठक घेण्यापुर्वी :-

  • प्रथम आपण ज्या बैठकांचे आयोजन करणार आहोत त्याचा आगोदर अजेंडा - रुपरेषा - उद्दिष्ट आपल्या समोर असणे आवश्यक आसते.
  • बैठकीचे पुर्व नियोजन असणे आवश्यक असते.
  • बैठक घेण्यापुर्वी किमान पाच दिवस आगोदर सदस्यांना सभे विषयी कळविण्यात यावे.
  • मागील सभेतील काही महत्वपुर्ण बाबीच्या पुर्ततेचा सचिवांना इतिवृतांत सांगणे महत्वाचे, त्याची तयारी.


(वरील मह्त्वाच्या बाबी आपण पुर्ण करुणच सभा घेण्यात यावी.)



सभा वृतांत नमुना खालिल प्रमाणे

RMSA आंतर्गत
शाळा व्यवस्थापन व विकास समिती सभा

दिनांक :- / / 2016.


आज दिनांक ….../....../ 2016 रोजी …....................................... या शाळेत सकाळी / दुपारी …............. ….या वेळी 'शाळा व्यवस्थापन व विकास समितीची' सभा शाळेचे मुख्याध्यापक व समितीचे अध्यक्ष श्री./श्रीम. …........ यांच्या अध्यक्षतेखाली आयोजीत करण्यात आली. श्री./ श्रीम. …....................... मुख्याध्यापक /सचिव यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे शब्द सुमनांनी स्वागत केले व सभेस सुरवात केली.

प्रथमत: सभेपुढे आजच्या बैठकीचा अजेंडा / रुपरेषा /उद्दिष्ट श्री,/श्रीम. …..... (SMDC सचिव) यांनी वाचुन दाखवला व विषय पत्रिका प्रत वाटप केली.

सभेपुढिल विषय :- ( सभेत जे विषय आपण घेणार आहोत ते विषय एका खाली एक लिहावेत )

(नमुना दाखल विषय )
  1. मागील सभेचा इतिवृतांत सांगणे.
  2. प्राप्त शाळा अनुदान माहिती सांगणे.
  3. शैक्षणिक साहित्य खरेदी
  4. वाचनालय निर्मिती करणे
  5. श्री./ श्रीम. …...... यांच्या बदल्यात नवीन सदस्य नियुक्ती करणे.
  6. शाळा सुधार आराखडा तयार करण्यासाठी समिती कडुन सुचना व नविन योजना माहिती
    (. प्रकारे आपणाला ज्या बाबींचा उल्लेख हवा आहे तो विषय यादी मध्ये नमुद करावा)


सभा तपशील :
(सभा सुरु झाल्यास सभा तपशील नोंदवणे खुप मह्त्वाचे आसते. त्यात सर्व सदस्यांची मते नोंदवली जावीत असे अभिप्रेत असते.) जसे-

  • सुरवातीला श्री./श्रीम. ….... सचिव यांनी मागील सभेतील वृतांत वाचला . झालेल्या चांगल्या कामाबद्दल सदस्यांनी शाळेचे अभिनंदन केले.
  • श्री./श्रीम. ….... मुख्याध्यापक /समिती अध्यक्ष यांनी शै.वर्ष 2016-17 करीता प्राप्त अनुदानाचा तपशील समिती समोर सांगितला. यात शाळा अनुदान 50,000 /- रु. शाळेच्या बॅक खात्यात जमा झाल्याचे सांगितले. त्या अनुशंगाने सदर बैठकीचे आयोजन केले आहे असे अध्यक्षांनी सांगितले.
    व त्या अनुदान विनियोगाबाबत सदस्यांना विचारण्यात आले.
  • अनुदान विनियोग करणे आवश्यक असल्याने श्री./श्रीम............. सहा.शिक्षक /शिक्षिका यांनी भूगोल विषय शिकवीत असताना अपु-या शै.साहित्याची माहिती सांगितली. त्यात त्यांनी ….................. नकाशे , . आवश्यक असल्याने ते त्वरीत खरेदी करावे असे सुचविले.
सदर …...... प्रकारचे नकाशे इ. खुप मह्त्वाचे आहे ते त्वरीत खरेदी करावे असे. समिती सदस्य श्री./श्रीम. …...... (नगरसेवक) यांनी सांगितले. त्यास सर्व सदस्यांनी सर्वानुमते होकार दर्शिवला.

  • क्रिडा शिक्षक व समिती सदस्य श्री. …........ यांनी खेळा करीता आवश्यक साहित्य खरेदी करण्यात यावे असे सुचविले त्यात त्यांनी ….................................... . साहित्य घेण्यात यावेत अशी विनंती केली.
या खेळाचे साहित्य मी. स्वत: माझ्या निधीतून शाळेस देण्यात येतील असे महिला बचत गटाच्या प्रमुख व समिती सदस्य श्रीम. …...... यांनी सांगितले . तेव्हा शाळा अनुदनाचा वापर इतर दुस-या मह्त्वाच्या कामासाठी वापरण्यात यावा असे सांगितले. यांच्या सुकर्तव्याचा स्विकार करण्यात येईल असे सचिवांनी सांगितले व सर्वानुमते त्यांचे आभार व्यक्त केले.

  • मुख्याध्यापक श्री./ श्रीम. …... यांनी कार्यालयीन उपयोगासाठी फर्निचर घेणे आवश्यक आहे असे सांगितले.
    तेव्हा सदर साहित्य वेगवेगळ्या निवेदा मगवुन त्वरित खरेदी करावे असे समितीने सर्वानुमते संमती दिली.

    ( अशा प्रकारे एक-एक विषयाला सुरवात करुन त्यावर आलेले मते नोंदविण्यात यावीत. वरील नमुन्याच्या आधारे ते लिहिण्यास नक्कीच सुलभ होईल.)

(शेवट करताना अशा प्रकारे करावा.......)

समारोप :-
आजच्या सभेस उपस्थित सद्स्यांचे श्री. / श्रीम....... यांनी आभार मानले व वरील कार्यपुर्ती अहवालाकरिता तसेच आवश्यकतेनुसार पुढील सभेचे आयोजन करण्यात येईल असे सांगितले. सभेसाठी उपस्थित सर्व सदस्यांना आल्पोपहार व चहा देण्यात आला.

सभेस उपस्थित सदस्यांची स्वाक्षरी :


.क्र.
नाव
भूमिका
स्वाक्षरी
1

अध्यक्ष

2

सदस्य - सचिव

3

सदस्य

4

सदस्य

5

सदस्य

6

सदस्य

7

सदस्य

8

सदस्य

9

सदस्य

10

सदस्य

11

सदस्य

12

सदस्य

13

सदस्य

14

सदस्य

15

सदस्य

16

सदस्य

17

सदस्य


मुख्याध्यापक / अध्यक्ष स्वाक्षरी
(शाळेचा शिक्का)
CREATED By :-SACHIN KAMBLE MUMBAI


Monday, October 3, 2016

बृहन्मुंबई : शाळा व्यवस्थापन व विकास समिती माहिती आढावा

बृहन्मुंबई : शाळा व्यवस्थापन व विकास समिती माहिती आढावा:  शाळा व्यवस्थापन व विकास समिती माहिती आढावा Some Important Information About SMDC सदर माहिती  सविस्तर  PDF स्वरुपात मिळवण्यासाठी खा...

शाळा व्यवस्थापन व विकास समिती माहिती आढावा

 शाळा व्यवस्थापन व विकास समिती माहिती आढावा


Some Important Information About SMDC
सदर माहिती  सविस्तर  PDF स्वरुपात मिळवण्यासाठी खालील लिंक वर Click करा.

>>>>>>> Click here to  Download SMDC Structure <<<<<<<<<<<<<<<<



शाळा व्यवस्थापन व विकास समितीची रचना ( SMDC )


.क्र.
नाव
प्रवर्ग
भूमिका
1

शाळेचे प्राचार्य / मुख्याध्यापक / प्रभारी मुख्याध्यापक
अध्यक्ष
2

शाळेचे उपप्राचार्य / पर्यवेक्षक / जेष्ठ शिक्षक
सदस्य - सचिव
3

गणित शिक्षक
सदस्य
4

विज्ञान शिक्षक
सदस्य
5

सामाजिक शास्त्र शिक्षक
सदस्य
6

महिला पालक प्रतिनिधी
सदस्य
7

पुरुष पालक प्रतिनिधी
सदस्य
8

स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधी
सदस्य
9

स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधी
सदस्य
10

अनु.जाती / अनु.जमाती प्रतिनिधी
सदस्य
11

शैक्षणिकदृष्ट्या मागास समुहाचा प्रतिनिधी
सदस्य
12

महिला संघटना / बचतगट प्रतिनिधी
सदस्य
13

शाळा व्यवस्थापन समिती सदस्य प्रतिनिधी
सदस्य
14

शिक्षणाधिकारी(माध्य.) यांनी नामनिर्देशित केलेले विज्ञानतज्ज्ञ - 1
सदस्य
15

शिक्षणाधिकारी(माध्य.) यांनी नामनिर्देशित केलेले कलातज्ज्ञ - 1
सदस्य
16

शिक्षणाधिकारी(माध्य.) यांनी नामनिर्देशित केलेले विभागातील तज्ज्ञ - 1
सदस्य
17

शिक्षणाधिकारी(माध्य.) यांनी नामनिर्देशित केलेले वित्त व लेखा विभागाचा प्रतिनिधी
सदस्य



शाळा इमारत उपसमिती


.क्र.
नाव
पदनाम
भूमिका
1

शाळेचे प्राचार्य / मुख्याध्यापक / प्रभारी मुख्याध्यापक
प्रमुख


शाळेचे उपप्राचार्य / पर्यवेक्षक / जेष्ठ शिक्षक
सदस्य
2

पंचायत/ शहर स्थानिक संस्था प्रतिनिधी
सदस्य
3

पालक
सदस्य
4

बांधकाम अभियंता / सल्लागार
सदस्य
5

लेखा परीक्षण व लेखा विभाग
सदस्य


विद्या उपसमिती

.क्र.
नाव
पदनाम
भूमिका
1

शाळेचे उपप्राचार्य / पर्यवेक्षक / जेष्ठ शिक्षक
प्रमुख
2

पालक
सदस्य
3

विज्ञान / गणित तज्ज्ञ
सदस्य
4

सामाजिक शास्त्र तज्ज्ञ
सदस्य
5

कला / हस्तकला/ क्रीडा तज्ज्ञ
सदस्य
6

विद्यार्थी
सदस्य



संकलन : Sachin Narayan Kamble (KRP -RMSA / SMDC)