शाळा
व्यवस्थापन व विकास समिती
सभा वृतांत कसा लिहावा.
PDF मध्ये माहिती प्राप्त करण्यासाठी खाली क्लिक करा.
- SMDC अर्थात शाळा व्यवस्थापन व विकास समिती ची सभा वृतांत कशा प्रकारे लिहिला जावा यासाठी नुमाना आपल्यास देण्याचा प्रयत्न करत आहे.
बैठक
घेण्यापुर्वी :-
- प्रथम आपण ज्या बैठकांचे आयोजन करणार आहोत त्याचा आगोदर अजेंडा - रुपरेषा - उद्दिष्ट आपल्या समोर असणे आवश्यक आसते.
- बैठकीचे पुर्व नियोजन असणे आवश्यक असते.
- बैठक घेण्यापुर्वी किमान पाच दिवस आगोदर सदस्यांना सभे विषयी कळविण्यात यावे.
- मागील सभेतील काही महत्वपुर्ण बाबीच्या पुर्ततेचा सचिवांना इतिवृतांत सांगणे महत्वाचे, त्याची तयारी.
(वरील
मह्त्वाच्या बाबी आपण पुर्ण
करुणच सभा घेण्यात यावी.)
सभा
वृतांत नमुना खालिल प्रमाणे
RMSA आंतर्गत
शाळा
व्यवस्थापन व विकास समिती
सभा
दिनांक
:- / / 2016.
आज
दिनांक ….../....../
2016 रोजी
….......................................
या
शाळेत सकाळी /
दुपारी
…............. ….या
वेळी 'शाळा
व्यवस्थापन व विकास समितीची'
सभा
शाळेचे मुख्याध्यापक व समितीचे
अध्यक्ष श्री./श्रीम.
…........ यांच्या
अध्यक्षतेखाली आयोजीत करण्यात
आली. श्री./
श्रीम.
…....................... मुख्याध्यापक
/सचिव
यांनी सभेस उपस्थित सर्व
सदस्यांचे शब्द सुमनांनी
स्वागत केले व सभेस सुरवात
केली.
प्रथमत:
सभेपुढे आजच्या बैठकीचा
अजेंडा / रुपरेषा
/उद्दिष्ट श्री,/श्रीम.
…..... (SMDC सचिव) यांनी
वाचुन दाखवला व विषय पत्रिका
प्रत वाटप केली.
सभेपुढिल
विषय :-
( सभेत जे विषय
आपण घेणार आहोत ते विषय एका
खाली एक लिहावेत )
(नमुना
दाखल विषय )
- मागील सभेचा इतिवृतांत सांगणे.
- प्राप्त शाळा अनुदान माहिती सांगणे.
- शैक्षणिक साहित्य खरेदी
- वाचनालय निर्मिती करणे
- श्री./ श्रीम. …...... यांच्या बदल्यात नवीन सदस्य नियुक्ती करणे.
- शाळा सुधार आराखडा तयार करण्यासाठी समिती कडुन सुचना व नविन योजना माहिती(इ. प्रकारे आपणाला ज्या बाबींचा उल्लेख हवा आहे तो विषय यादी मध्ये नमुद करावा)
सभा
तपशील :
(सभा
सुरु झाल्यास सभा तपशील नोंदवणे
खुप मह्त्वाचे आसते. त्यात
सर्व सदस्यांची मते नोंदवली
जावीत असे अभिप्रेत असते.)
जसे-
- सुरवातीला श्री./श्रीम. ….... सचिव यांनी मागील सभेतील वृतांत वाचला . झालेल्या चांगल्या कामाबद्दल सदस्यांनी शाळेचे अभिनंदन केले.
- श्री./श्रीम. ….... मुख्याध्यापक /समिती अध्यक्ष यांनी शै.वर्ष 2016-17 करीता प्राप्त अनुदानाचा तपशील समिती समोर सांगितला. यात शाळा अनुदान 50,000 /- रु. शाळेच्या बॅक खात्यात जमा झाल्याचे सांगितले. त्या अनुशंगाने सदर बैठकीचे आयोजन केले आहे असे अध्यक्षांनी सांगितले.व त्या अनुदान विनियोगाबाबत सदस्यांना विचारण्यात आले.
- अनुदान विनियोग करणे आवश्यक असल्याने श्री./श्रीम............. सहा.शिक्षक /शिक्षिका यांनी भूगोल विषय शिकवीत असताना अपु-या शै.साहित्याची माहिती सांगितली. त्यात त्यांनी ….................. नकाशे , इ. आवश्यक असल्याने ते त्वरीत खरेदी करावे असे सुचविले.
सदर
…...... प्रकारचे नकाशे
इ. खुप मह्त्वाचे
आहे ते त्वरीत खरेदी करावे
असे. समिती सदस्य
श्री./श्रीम.
…...... (नगरसेवक) यांनी
सांगितले. त्यास
सर्व सदस्यांनी सर्वानुमते
होकार दर्शिवला.
- क्रिडा शिक्षक व समिती सदस्य श्री. …........ यांनी खेळा करीता आवश्यक साहित्य खरेदी करण्यात यावे असे सुचविले त्यात त्यांनी ….................................... इ. साहित्य घेण्यात यावेत अशी विनंती केली.
या
खेळाचे साहित्य मी. स्वत:
माझ्या निधीतून शाळेस
देण्यात येतील असे महिला बचत
गटाच्या प्रमुख
व समिती सदस्य श्रीम. …......
यांनी सांगितले .
तेव्हा शाळा अनुदनाचा
वापर इतर दुस-या
मह्त्वाच्या
कामासाठी वापरण्यात यावा असे
सांगितले. यांच्या
सुकर्तव्याचा स्विकार करण्यात
येईल असे सचिवांनी
सांगितले व सर्वानुमते त्यांचे
आभार व्यक्त केले.
- मुख्याध्यापक श्री./ श्रीम. …... यांनी कार्यालयीन उपयोगासाठी फर्निचर घेणे आवश्यक आहे असे सांगितले.तेव्हा सदर साहित्य वेगवेगळ्या निवेदा मगवुन त्वरित खरेदी करावे असे समितीने सर्वानुमते संमती दिली.
(
अशा
प्रकारे एक-एक
विषयाला सुरवात करुन त्यावर
आलेले मते नोंदविण्यात यावीत.
वरील
नमुन्याच्या आधारे ते लिहिण्यास
नक्कीच सुलभ होईल.)
(शेवट
करताना अशा प्रकारे करावा.......)
समारोप
:-
आजच्या सभेस उपस्थित
सद्स्यांचे श्री. / श्रीम.......
यांनी आभार मानले व
वरील कार्यपुर्ती अहवालाकरिता
तसेच आवश्यकतेनुसार पुढील
सभेचे आयोजन करण्यात येईल
असे सांगितले. सभेसाठी
उपस्थित सर्व सदस्यांना
आल्पोपहार व चहा देण्यात आला.
सभेस
उपस्थित सदस्यांची स्वाक्षरी
:
-
अ.क्र.नावभूमिकास्वाक्षरी1
अध्यक्ष
2
सदस्य - सचिव
3
सदस्य
4
सदस्य
5
सदस्य
6
सदस्य
7
सदस्य
8
सदस्य
9
सदस्य
10
सदस्य
11
सदस्य
12
सदस्य
13
सदस्य
14
सदस्य
15
सदस्य
16
सदस्य
17
सदस्य
मुख्याध्यापक
/ अध्यक्ष स्वाक्षरी
(शाळेचा
शिक्का)
CREATED
By :-SACHIN KAMBLE MUMBAI
No comments:
Post a Comment
Give Your Comments